‘इतिहास’ हा एक कुतुहलाचा विषय आणि छंद म्हणून अनेकांच्या आवडीचा असतो. .
इतिहासाची अभ्यासपद्धती आणि इतिहासलेखन म्हणजे काय, तसेच इतिहासलेखनाचा इतिहास या गोष्टींची माहिती
विद्यार्थ्यांना आतापर्यंत फक्त महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवरच करून दिली जात असे. शालेय अभ्यासक्रमात
त्याचा समावेश केला गेला नव्हता. त्यामुळे इतिहासाची शास्त्रशुद्ध पद्धती म्हणजे काय, याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन, वास्तविक पाहता इतिहासाचे रोजच्या व्यावहारिक जीवनाशी अत्यंत घट्ट नाते आहे. ते स्पष्ट करणारी ‘उपयोजित
इतिहास’ किंवा ‘जनांसाठी इतिहास’ ही नवीन ज्ञानशाखा गेल्या काही दशकांमध्ये विकसित होऊ लागलेली आहे.
परदेशांमधील विद्यापीठांमधून या विषयाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पालवी ज्ञानमंदिर विद्यालयात नवीन विषयाची माहिती
करून देण्याबरोबरच विविध व्यवसायांतील मूल्यवर्धित सेवांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची तसेच असा अभ्यास
असणाऱ्या जाणकार इतिहासकारांची आवश्यकता कशी भासते, तेही सांगितले आहे. त्यासाठीचे अभ्यासक्रम आणि ते
अभ्यासक्रम जिथे उपलब्ध आहेत अशा संस्थांची माहिती करून दिलेली आहे.
रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्ट असो, व्यवसायाचे कोणतेही क्षेत्र असो, त्या त्या गोष्टीचा, त्या त्या व्यावसायिक
क्षेत्राच्या विकासाचा स्वतःचा इतिहास असतो आणि त्या इतिहासाच्या ज्ञानाचा व्यवसायातील कौशल्यवृद्धीसाठी उपयोग
होतो, ही बाब या पाठ्यपुस्तकात स्पष्ट केलेली आहे. शालेय पातळीवरील नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात सामाजिक-राजकीय परिसराची ओळख
इथपासून ते आंतरराष्ट्रीय संबंध आणि आपल्या देशातील राजकीय प्रक्रियांचे स्वरूप इतका व्यापक आशय समाविष्ट केला
आहे.
Mr.Sangam B Pawar
H O D
Deparment Of Geography
अनंत कालापासून मानव या भूतलावर राहत आला आहे. त्या भूतलाचा संपूर्ण अभ्यास मुलांना व्हावा किंवा जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून मुलांना पुस्तकांसोबत प्रोजेक्टर वर ईलर्निंग द्वारे सुद्धा व ग्रह उपग्रहांची माहिती दाखवली जाते. काही गोष्टी प्रॅक्टिकली सुद्धा दाखवल्या जातात. क्षेत्रभेट शिकवत असताना एखाद्या ठिकाणाला भेट देऊन त्यासाठी सर्व आवश्यक गोष्टींची देखील माहिती दिली जाते. (उदाहरणार्थ कॅमेरा, होकायंत्र, नकाशा.......) गॅलिलिओ यांनी ग्रहांची माहिती दिली आहे. त्या पूर्वीच याची माहिती वेदांनी दिली आहे .त्यामुळे वेदांची देखील माहिती मुलांना दिली जाते.
Miss.Sunita S Kharat
Asst.Teacher
यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो.
Mr.Vaibhav S More
H O D
No comments:
Post a Comment