Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Env & Science

प अ/ विज्ञान

  • विज्ञान सोपे प्रयोग
  • १ते १० वीचे प्रयोग
  • करू प्रयोग शिकु विज्ञान,
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
  •             पालवी ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र तथा भौतिकशास्त्र या सर्व विज्ञानाच्या शाखांचे सखोल वैज्ञानिक ज्ञान मिळावे या उद्देशाने 20 नोव्हेंबर 2022 पासून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पाठ्यपुस्तकामध्ये प्रामुख्याने भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने जीवशास्त्र, पर्यावरण ,सूक्ष्मजीवशास्त्र , जैवतंत्रज्ञान या सर्व विषयाचे Fundamental पासून Applied पर्यंत विविध उपशाखा विषयांचे थेरी व प्रात्यक्षिक नियमित घेतले जातात.
    वनस्पती शास्त्र या उपशाखे संदर्भात नैसर्गिक साधन संपत्ती, पर्यावरण व सभोवतालच्या वनस्पतींचा त्यांच्या संरचनेचा आणि वनस्पतीतील औषधी उपयोगी गुणधर्मांचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा याकरता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे विद्यालयाच्या बागेत जाऊन विविध वनस्पतींचा प्रत्यक्षपणे अभ्यास केला जातो.. तसेच प्रत्येक विषय हा महत्त्वाचा आहे. याकरता आपल्या प्रयोगशाळेत ICT Based Teaching Learning Methods चा जास्तीत जास्त वापर केला जातो. विद्यार्थ्यांना डिजिटल प्रोजेक्टरच्या सहाय्याने Video Lectures, PowerPoint Presentation (PPT),Animations इत्यादींचा वापर विभागा द्वारे केला जातो.विभागातील प्रयोग शाळेत अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या प्राण्यांचे नमुने प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत, विभागाची प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज आहे. विभागामध्ये संयुक्त सूक्ष्मदर्शिका, विविध प्रकारच्या प्राण्यांची संरचना दर्शवणारे काचेचे पर्मनंट स्लाइड्स उपलब्ध आहेत.मानवी हृदय, पचन संस्था , मेंदू, कानाची व डोळ्याची संरचना, रक्तभिसरण संस्था विविध प्रकारची भिंगे, मानवी डोळा, मानवी हृदय, वनस्पती पेश असे अनेक महत्वपूर्ण वैज्ञानिक माहिती दर्शक POLY ART TEACHING चार्ट उपलब्ध आहेत.
    सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय मेडिकलशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांची रुची या विषयाकडे दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयांमध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीवांचा अभ्यास प्रयोगशाळेतच केला जातो..
    भौतिकशास्त्र तर या संपूर्ण विश्वात फार वेगळे आहे. भौतिकशास्त्रीय संकल्पना आणि नियमानुसार प्रत्येक ठिकाणी उपभोग करून आजच्या तंत्रज्ञानाला विकसित करण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता भौतिकशास्त्र विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. आणि हा विषय सुद्धा मुलांना नियमित प्रात्यक्षिकांसह शिकवला जातो. प्रयोगशाळेत Watch Glass, Convex Lense, Thermometer,Glass Slab, Sprit Lamp, Dissection Box, असं बरंच काही साहित्य उपलब्ध आहे. यासोबतच असाइन्मेंट, प्रोजेक्ट टेस्ट , विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक सहल यासोबतच अनेक शैक्षणिक उपक्रमांचा यात समावेश आहे.
    रसायनशास्त्र या जगात प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी रसायन असतं. या रसायनांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सोपे व्हावे याकरिता NaCl,HCL, H2SO4,BaCl , CaCl, CuSO4 Etc... यासारखे अनेक रसायनिक सोलुशन आणि आम्ल प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत. या माध्यमातून मुलं स्वतः प्रयोगशाळेत विविध प्रयोग करून प्रात्यक्षिक रित्या शिक्षण घेत आहे.
          
    त्यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास नक्कीच मदत मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या रासायनिक, प्राणीशास्त्रीय, वनस्पतीशास्त्रीय, सूक्ष्मजीव शास्त्रीय, भौतिकशास्त्रीय संकल्पना या स्पष्ट होत आहेत.अशावेळी एखादी नवीन किंवा वेगळी कल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आल्यास ती लगेचच प्रत्यक्षात आणण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न केले जातात. आधुनिक ज्ञान आणि भविष्यातील संधी याविषयी मोलाचे मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिले जाते.
                                 एकूणच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वाटचाल सौ.डिंपल घाडगे सचिवा, प्रभा-हिरा प्रतिष्ठान व माननीय मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब सरकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विज्ञान व तंत्रज्ञान विभाग सहाय्यक सहशिक्षिका सुनिता खरात मॅडम यांच्या सहाय्याने यशस्वीपणे सुरू आहे....


                                                                                          Mr.Vaibhav Suresh More
                                                                                                                                    (HOD)
                                                                                                                          B.Sc (Life Science) B.J

        विज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. बदलते युग जगभरात झालेले बदल आपल्या डोळ्यासमोर दिसत. पालवी ज्ञानमंदिर मध्ये विज्ञान विषय शिकवत असतानाच मुलांकडून काही छोटे मोठे प्रयोग करून घेतले जातात. प्रयोगांच्या माध्यमातून शिकविले जाते. प्रयोगाद्वारे शिकविल्यामुळे मुलांना लवकर समजते. आणि लक्षात सुद्धा राहते.आणि वर्षभरामध्ये जे प्रयोग शिकविलेले असतात, किंवा त्यावर आधारित दुसरे देखील प्रयोग करायला मुलं शिकतात. आणि त्याचेच एक विज्ञान प्रदर्शन ठेवले जाते. त्यामध्ये मुलं वेगवेगळे प्रयोग करून दाखवतात. आणि ते पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक शाळेचे मुख्याध्यापक,संस्थापक येत असतात. त्यामध्ये मुलांचे कौतुक देखील केले जाते. त्यामुळे मुलांमधील प्रगती वाढते. आणि त्याचा मुलांना देखील  आनंद मिळतो.

                                                    Miss.Sunita S Kharat
                                                            Asst.Teacher

No comments:

Post a Comment