पालवी प्ले ग्रुप
पालवी ज्ञान मंदिर अंतर्गत प्ले ग्रुप या विभागामध्ये असणारे विद्यार्थी यांना शाळा ही गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते. विद्यार्थी शाळेत रमावे त्यांना खेळता यावे यासाठी विविध खेळणी लहान मोठी त्यांना बसून खेळता याव्या अशा गाड्या भावली टेडी मनोर अशा गोष्टी या प्लेग्रुप अंतर्गत मुलांना उपलब्ध करून दिल्या जातात. मुलांना शिकवताना उपयोग करावे असे प्लास्टिकचे फळ भाज्या Flash , card's ,पपेट, तसेच मोजमाप, या साठी मण्यांची माळ ,पझल त्याबरोबर मुलांना स्पर्शाचे ज्ञान कळावे .यासाठी वापरण्यात येणाऱ्या माऊ, कठीण ,गोष्टी मुलांच्या संकल्पना स्पष्ट करता येतात .मुलांना नृत्याची आवड असते. त्यानुसार त्यांचे तास कलाकृती यामध्ये ठसे काम प्रिंट रंगकाम या गोष्टी मुलांच्या आनंद वाढवतात आणि मुलांची शाळेबद्दल आवड अधिक निर्माण होते मुलांना गोष्टी गाणी प्रोजेक्टरच्या माध्यमातून. व्हिजयुलन यामधून अधिक जाणून घेण्यास आवडतात .
या सर्वांमध्ये या वर्गात मुलांसाठी महत्त्वाचे असते. ते त्यांची शारीरिक, मानसिक वाढ होणे यासाठी त्यांचे भरपूर खेळ घेणे .गप्पा ,गोष्टी ,योग्य, आहार या सर्वांची काळजी या वर्गांमध्ये घेतली जाते.
Miss.Komal Dimple Rajkumar
Head of Department
प्ले ग्रुप या मुलांना जास्त खेळायची सवय असते. व त्या मुलांचं खेळायचं वय आहे. त्या मुलांना मानवी शरीराच्या अवयवांची नावे, फळ ,प्राणी ,फुल यांची ओळख करून देणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांना हसत हसत जास्त खेळण्यातून शिकवलं जातं. अंक जर शिकवायचे म्हटले तर दगड, मनी, पाने , डाळ याचा उपयोग करून मुलांना अंक शिकवले जातात .लहान मुलांना चव कळण्यासाठी साखर ,मीठ याचा उपयोग करून मुलांना समजते व पालवी ज्ञानमंदिर प्ले ग्रुप मध्ये घेतले जाते. मुलांना चित्रवाचन खूप महत्त्वाचे आहे .मुलांच्या लक्षात राहण्यासाठी चित्र दाखवले पाहिजे. प्ले ग्रुपचे मुलं 20 मिनिट बसू शकतात .त्यांना जास्त वेळ बसण्याची सवय नसते . मुलं जर जास्त वेळ बसले तर त्यांची मानसिकता बिघडते. प्ले ग्रुपच्या मुलांना खेळ व खेळणी खूप महत्त्वाचे आहे. ते त्यात गुंतले जातात. सतत खेळण्याने मुलांची बुद्धी, क्षमता, ज्ञान वाढते. आकलन शक्ती वाढते. प्ले ग्रुपचे मुलं खूप गोड आहे. त्या मुलांना काय करायचे आहे, ते करू देणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या आवडीनुसार शिकवणे महत्त्वाचे आहे.
Miss.Sharddha Kumbhar
Asst.Teacher
Eductional Activities Of Palawi Play Group
No comments:
Post a Comment