पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये कुतूहल कोपरा हा नावीन्यपूर्ण उपक्रम 2022 पासून चालू करण्यात आला आहे .सहा जून 2022 पासून सुरुवात केली. आठवड्यातला एकच वार निवडला आहे. सोमवार सकाळी दहा वाजता वस्तू एका नियोजित ठिकाणी ठेवायची व चार वाजता काढायची विद्यार्थी दिवसभर निरीक्षण करतात. ती वही कुतुहल कोपरा या उपक्रम समन्वयक कडे देतात .त्यानंतर विभाग प्रमुख त्या वही
चेक करतात.त्यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढते व आकलन क्षमता सुद्धा वाढते. व मुलांना त्यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात .कुतूहल म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती जाणून घेणे. मुलांच्या मनामध्ये
नवनवीन कल्पना निर्माण होतात. मुलांना प्रश्न पडणे गरजेचे आहे एखाद्या गोष्टीची खोलवर माहिती घेणे. त्यामुळे मुलांच्या मध्ये कुतूहल निर्माण होतो. कुतूहल कोपरामध्ये उदाहरणात फुलदाणी, झाड ,पृथ्वी मॉडेल ,दप्तर, भाज्या, आरसा, महामानवांचे फोटो, खुर्ची , टेबल, टेटी , वही, पुस्तक, पेन, घड्याळ , बोर्ड, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या कुतूहल कोपऱ्यामध्ये उपयोगी आहे.या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास खूप मदत मिळते आणि याचं उदाहरण म्हणजे या उपक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली प्रश्न आणि समन्वयकांनी त्या प्रश्नांची दिलेली उत्तरे...
Miss.Arati D Kumbhar
Co-Ordinator