Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Showing posts with label जनरल नॉलेज. Show all posts
Showing posts with label जनरल नॉलेज. Show all posts

Tuesday, May 9, 2023

जनरल नॉलेज

            पालवी ज्ञानमंदिर विद्यालयात सन - 2022 पासून जनरल नॉलेज हा उपक्रम घेतला जात आहे. हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश हा आहे की, विद्यार्थ्यांना जगातील चालू घडामोडी समजतील. व त्यांची प्रगती  होत राहील. यामध्ये फळ्यावर एक जनरल नॉलेज चा प्रश्न लिहिला जातो. व त्या प्रश्नाचे उत्तर पण त्या प्रश्नाच्या खाली लिहिले जाते. दररोज विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार तो प्रश्न व उत्तर त्यांच्या वहीत लिहून घेतात. असे दररोज विद्यार्थी वहीत एक एक प्रश्न लिहून घेतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त माहिती मिळते. जनरल नॉलेज चे प्रश्न नुसते लिहून ठेवून त्यांना त्याची माहिती मिळतेआहे का? हे पडताळून पाहण्यासाठी त्या प्रश्नावर तीन महिन्यांनी टेस्ट घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी प्रश्न नुसते लिहून न ठेवता, ते सारखे वाचतात. विद्यार्थ्यांना समाजातील अधिकाधिक माहिती मिळते. जगातील शास्त्रज्ञ, थोर नेते, क्रांतिकारक वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी घटकांची माहिती विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळत राहते.

                                                Miss.Priti P Khandekar

                                                                Co-Ordinator