पालवी ज्ञानमंदिर विद्यालयात सन - 2022 पासून जनरल नॉलेज हा उपक्रम घेतला जात आहे. हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश हा आहे की, विद्यार्थ्यांना जगातील चालू घडामोडी समजतील. व त्यांची प्रगती होत राहील. यामध्ये फळ्यावर एक जनरल नॉलेज चा प्रश्न लिहिला जातो. व त्या प्रश्नाचे उत्तर पण त्या प्रश्नाच्या खाली लिहिले जाते. दररोज विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार तो प्रश्न व उत्तर त्यांच्या वहीत लिहून घेतात. असे दररोज विद्यार्थी वहीत एक एक प्रश्न लिहून घेतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त माहिती मिळते. जनरल नॉलेज चे प्रश्न नुसते लिहून ठेवून त्यांना त्याची माहिती मिळतेआहे का? हे पडताळून पाहण्यासाठी त्या प्रश्नावर तीन महिन्यांनी टेस्ट घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी प्रश्न नुसते लिहून न ठेवता, ते सारखे वाचतात. विद्यार्थ्यांना समाजातील अधिकाधिक माहिती मिळते. जगातील शास्त्रज्ञ, थोर नेते, क्रांतिकारक वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी घटकांची माहिती विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळत राहते.
Miss.Priti P Khandekar
No comments:
Post a Comment