Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Showing posts with label बिनभितींची शाळा. Show all posts
Showing posts with label बिनभितींची शाळा. Show all posts

Sunday, May 14, 2023

बिनभितींची शाळा

        अभ्यास विषय, अभ्यासक्रम, इयत्तावार विषयरचना ही चौकट मोडायची नाही, पण चौकटीचं कुंपणही करायचं नाही. तिला थोडा थोडा धक्का देत आतील अवकाश वाढवत न्यायचा. त्या अवकाशाची पोकळी न बनवता त्यात आशयही भरायचा. शिक्षकांची व मुलांची सृजनशीलता, कल्पकता, स्वातंत्र्य, व्यक्त होण्याची उर्मी, संवेदनशीलता यांना खतपाणी घालत, इथे शिकवणारे कोणी नाही, शिकणारे मात्र अनेक आहेत, असं वातावरण कायम जोपासायचं, हा येथील सर्व प्रयासामागचा मूळ गाभा आहे. विद्यार्थ्यांनी मुक्त वावरावं निसर्ग आपला खूप मोठा गुरु आहे निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व असावे व अभ्यासाची गोडी लागावी यासाठी पालवी ज्ञान मंदिरातील मातृवन बहार बागेत बिनभिंतीची उघडी शाळा चालवली जाते.

                                                                                Shri.Babasaheb Sarkate 

                                                                                         Co-Ordinator