अभ्यास विषय, अभ्यासक्रम, इयत्तावार विषयरचना ही चौकट मोडायची नाही, पण चौकटीचं कुंपणही करायचं नाही. तिला थोडा थोडा धक्का देत आतील अवकाश वाढवत न्यायचा. त्या अवकाशाची पोकळी न बनवता त्यात आशयही भरायचा. शिक्षकांची व मुलांची सृजनशीलता, कल्पकता, स्वातंत्र्य, व्यक्त होण्याची उर्मी, संवेदनशीलता यांना खतपाणी घालत, इथे शिकवणारे कोणी नाही, शिकणारे मात्र अनेक आहेत, असं वातावरण कायम जोपासायचं, हा येथील सर्व प्रयासामागचा मूळ गाभा आहे. विद्यार्थ्यांनी मुक्त वावरावं निसर्ग आपला खूप मोठा गुरु आहे निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व असावे व अभ्यासाची गोडी लागावी यासाठी पालवी ज्ञान मंदिरातील मातृवन बहार बागेत बिनभिंतीची उघडी शाळा चालवली जाते.
Shri.Babasaheb Sarkate
Co-Ordinator
No comments:
Post a Comment