पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील पालवी प्रकल्पातील विशेष बालकांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर राबविण्यात आले. प्रकल्पातील बालके अनाथ असल्याने अनेक अडचणींना प्रकल्पाला सामोरे जावे लागते.आणि आरोग्य व शिक्षण यांसह प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेमध्ये आधार कार्ड हे महत्त्वाचे बनले आहे ही बाब लक्षात घेऊन प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या सचिवा.सौ.डिंपल घाडगे यांनी व शिक्षक वैभव मोरे यांनी अतोनात मेहनत घेऊन अनेक अधिकाऱ्यांच्या मदतीने दस्तऐवज जमा केले व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आज दिनांक 14 मे 2023 रोजी पूर्ण केली.
![]() |
During Aadhar Update Camp 14/05/2023 |
अधिक माहिती साठी 9673664455 / 9860069949 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.palawi.org या संकेतस्थळावर भेट द्या.
No comments:
Post a Comment