Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Marathi

        मराठी विभाग अंतर्गत वाचन, लेखन, श्रवण, मराठी भाषेचे अलंकार व वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण शिकवले जाते.सोबतच मराठी भाषेचा ज्ञानसंचय वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध वकृत्व स्पर्धेत उतरविले जाते.विविध विषयावर नाटक, लेखन, निबंध लेखन, पत्रलेखन, अनेक महान महापुरुषांची जीवन चरित्र समजावून घेऊन त्यातील आशय विद्यार्थी करीत आहेत.मराठी भाषा वाटते तितकी सोपी ही नाही यात अनेक अलंकारिक भाषेतील शब्द आलेले आहेत मग कधी आदिवासी पाड्यावरची भाषा असेल, संतवाणी असेल, अहिराणी भाषा असेल, वऱ्हाडी भाषा असेल, वारली भाषा असेल अशा विविध भाषांचा अभ्यास पालवी ज्ञानमंदिरात केल्या जातो.शब्दांचा अभ्यास जास्तीत जास्त व्हावा यासाठी विद्यार्थी व शिक्षक शब्दकोशाचा देखील अभ्यास करीत आहेत.मराठी भाषेचा शिक्षकांना अनुभव जरी असेल तरीदेखील विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यापूर्वी स्वतः अभ्यास करूनच शिकविले जाते.

भाषा

No comments:

Post a Comment