विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
पालवी ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र तथा भौतिकशास्त्र या सर्व विज्ञानाच्या शाखांचे सखोल वैज्ञानिक ज्ञान मिळावे या उद्देशाने 20 नोव्हेंबर 2022 पासून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पाठ्यपुस्तकामध्ये प्रामुख्याने भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने जीवशास्त्र, पर्यावरण ,सूक्ष्मजीवशास्त्र , जैवतंत्रज्ञान या सर्व विषयाचे Fundamental पासून Applied पर्यंत विविध उपशाखा विषयांचे थेरी व प्रात्यक्षिक नियमित घेतले जातात.
वनस्पती शास्त्र या उपशाखे संदर्भात नैसर्गिक साधन संपत्ती, पर्यावरण व सभोवतालच्या वनस्पतींचा त्यांच्या संरचनेचा आणि वनस्पतीतील औषधी उपयोगी गुणधर्मांचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा याकरता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे विद्यालयाच्या बागेत जाऊन विविध वनस्पतींचा प्रत्यक्षपणे अभ्यास केला जातो.. तसेच प्रत्येक विषय हा महत्त्वाचा आहे. याकरता आपल्या प्रयोगशाळेत ICT Based Teaching Learning Methods चा जास्तीत जास्त वापर केला जातो. विद्यार्थ्यांना डिजिटल प्रोजेक्टरच्या सहाय्याने Video Lectures, PowerPoint Presentation (PPT),Animations इत्यादींचा वापर विभागा द्वारे केला जातो.विभागातील प्रयोग शाळेत अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या प्राण्यांचे नमुने प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत, विभागाची प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणाने सुसज्ज आहे. विभागामध्ये संयुक्त सूक्ष्मदर्शिका, विविध प्रकारच्या प्राण्यांची संरचना दर्शवणारे काचेचे पर्मनंट स्लाइड्स उपलब्ध आहेत.मानवी हृदय, पचन संस्था , मेंदू, कानाची व डोळ्याची संरचना, रक्तभिसरण संस्था विविध प्रकारची भिंगे, मानवी डोळा, मानवी हृदय, वनस्पती पेश असे अनेक महत्वपूर्ण वैज्ञानिक माहिती दर्शक POLY ART TEACHING चार्ट उपलब्ध आहेत.
सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय मेडिकलशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांची रुची या विषयाकडे दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयांमध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीवांचा अभ्यास प्रयोगशाळेतच केला जातो..
भौतिकशास्त्र तर या संपूर्ण विश्वात फार वेगळे आहे. भौतिकशास्त्रीय संकल्पना आणि नियमानुसार प्रत्येक ठिकाणी उपभोग करून आजच्या तंत्रज्ञानाला विकसित करण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता भौतिकशास्त्र विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. आणि हा विषय सुद्धा मुलांना नियमित प्रात्यक्षिकांसह शिकवला जातो. प्रयोगशाळेत Watch Glass, Convex Lense, Thermometer,Glass Slab, Sprit Lamp, Dissection Box, असं बरंच काही साहित्य उपलब्ध आहे. यासोबतच असाइन्मेंट, प्रोजेक्ट टेस्ट , विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक सहल यासोबतच अनेक शैक्षणिक उपक्रमांचा यात समावेश आहे.
रसायनशास्त्र या जगात
प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी
रसायन असतं. या
रसायनांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना
सोपे व्हावे याकरिता
NaCl,HCL, H2SO4,BaCl , CaCl, CuSO4 Etc... यासारखे
अनेक रसायनिक सोलुशन
आणि आम्ल प्रयोगशाळेत
उपलब्ध आहेत. या माध्यमातून
मुलं स्वतः प्रयोगशाळेत
विविध प्रयोग करून
प्रात्यक्षिक रित्या शिक्षण घेत
आहे.
1) आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म प्रात्यक्षिक
क्षाराच्या द्रावणाची वाहकता....
हा प्रयोग आहे आयनिक संयुगांच्या बाबत यामध्ये आम्ही आपल्या प्रयोगशाळेतील सोडियम क्लोराइड, पोटॅशियम आयोडाइड, आणि बेरियम क्लोराइड यांचे नमुने तथा पाणी हे सर्व इंडिव्हिजिवली एका चंचुपात्रात घेऊन त्यामध्ये ग्राफाईट च्या दोन कांडया टाकून त्यांना एक दिवा तथा एक विद्युत घट जोडून आम्ही क्षाराच्या द्रावणाची वाहकता प्रत्यक्षपणे तपासली.
या प्रयोगादरम्यान आयोनिक संयुगांची जलीय द्रावणे ही विद्युत वाहक असतात, कारण पाण्यातील द्रावणात त्यांचे विचरण झालेले आयन असतात... आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म अशी बरीच काही माहिती या प्रयोगादरम्यान आमच्या शिक्षकांनी आम्हाला अतिशय सोप्या सरळ भाषेत समजून सांगितली...
2) धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर
होणारी अभिक्रिया
धातूंची
इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया संदर्भातील प्रयोग या प्रयोगादरम्यान
आम्ही फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट यांचे जलीय द्रावणे दोन मोठ्या परीक्षण नळी मध्ये
घेतली आणि फेरस सल्फेट च्या जलीय द्रावणात एक स्वच्छ तांब्याची तार एका धाग्याच्या
मदतीने तर कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या जलीय द्रावणात एक स्वच्छ असा लोखंडी खिळा
बुडवून ठेवला. CuSO4 निळ्या रंगाचे द्रावण फिकट हिरव्या रंगाचे झाले. प्रयोगानंतर लोखंडी
खिळा तांबूस तपकिरी रंगाचा झाला.
3) मृगजळ म्हणजे नेमकं काय ?
पालवी ज्ञानमंदिर विद्यालयामधील इयत्ता दहावीच्या मुलांसमोर पडलेला हा प्रश्न.? याचं उत्तर शोधताना व प्रत्यक्षपणे मृगजळ म्हणजे नेमकं काय? हे अनुभवातून प्रयोगातून शिकताना टिपलेले काही छायाचित्र....खरच प्रकाश किरणांच्या दिशेने उष्ण हवेत होणाऱ्या वक्रीकरणामुळे दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेला आपण मृगजळ का म्हणतो... हे आम्हाला आमच्या शिक्षकांच्या मदतीने प्रायोगिक स्वरूपाने कळाले...व्यवहारिक जीवनात रोजच आपण बऱ्याच घटना अनुभवतो
काचेच्या ग्लासमध्ये तळाशी ठेवलेले नाणे वर आल्यासारखे जाणवतो.
या प्रयोगा दरम्यान काचेच्या ग्लास मधील पाण्यात पेन्सिलचा अर्धवट बुडालेला भाग हा जाड दिसत आहे परंतु याउलट बाहेरील भाग तिरका किंवा वाकडा झालेला दिसत आहे म्हणजेच याला आभास होणे असेही आपण म्हणू शकतो. आमच्या शाळेत नेहमीच असे विविध प्रयोग आम्ही करत असतो त्यातीलच हा एक प्रयोग जो अविस्मरणीय आहे.
त्यातीलच
हा
एक
विद्युतशक्ती
अर्थात
विद्युतधारा
संदर्भातील
प्रयोग
विद्युत
परिपथामध्ये
ऊर्जेचे
स्थानांतरण
कसे
होते.?
विद्युतधारेचे
औष्णिक
परिणाम
कसे
असतात.?
विद्युतधारेचे
चुंबकीय
परिणाम
.?
विद्युत
धारा
आणि
चुंबकीय
क्षेत्र
यांचा
काही
सबंध
आहे
का.?
या प्रयोगादरम्यान आम्हाला विद्युतधारेचे धनप्रभार , ऋणप्रभार ,विद्युत घट,व्होल्टमीटर , एमीटर, प्लगकळ जोडणीच्या तारा, विभवांतर, विद्युत शक्तीचे एकक, वीजयुक्त तार, तटस्थ तार, भूसंपर्कन तार आधी माहिती यादरम्यान आम्हाला आमच्या शिक्षकांनी दिली. यादरम्यान केलेल्या काही प्रयोगाचे छायाचित्रे...
रूम हीटर चा
वापर करून त्यामध्ये
असणारे कॉइल च्या
आकारावर विभवांतर
कसे अवलंबून असते.
या रूम हीटर
कॉइल ला स्पर्श
केल्यास आपल्याला विजेचा झटका
लागत नाही.अर्थात
विद्युत परिपथात विद्युतरोध जोडल्यावर
विद्युत धारेचे रूपांतर उष्णता
यामध्ये होताना आम्ही पाहिले.तसेच बल्ब मध्ये टंगस्टन धातूची तार असते तेथे विभवांतर कसे व किती प्रमाणात घडते . बल्ब मधून प्रकाश बाहेर का पडतो त्याच्या आत नायट्रोजन गॅस असते, विद्युत शक्तीचे सुवाहक दुर्वाहक अशा अनेक संकल्पना आम्ही प्रयोग करून समजून घेतल्या. विद्युतशक्ती संदर्भात असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे पुस्तकातून वाचायला मिळाले परंतु वास्तवात हे सर्व प्रयोग करून अनुभवातून शिकताना आम्हाला खूप मज्जा आली.
अभ्यासाचा
" हृदयरोग "
व्हावा लागतो....,
त्यावेळेस " स्वप्नं "
साकार होतात....!
प्रकाशाच्या वाटा ; प्रकाश हे ऊर्जेचे एक स्वरूप असून त्यामुळे आपल्या डोळ्यांना दृश्य संवेदना प्राप्त होतात. प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्रारणांचे एक स्वरूप आहे. प्रकाशाचे स्त्रोत नैसर्गिक तसेच कृत्रिम असतात.
इयत्ता दहावीतील मुलं प्रकाशाचे परावर्तन आणि
प्रकाशाचे अपवर्तन प्रयोगशील हसत खेळत शिकतांना...
आम्ही निघालो फिराया...
सूक्ष्मजीवांच्या जगात...
घेऊनीया हातात सूक्ष्मदर्शिका ...
तुम्हाला
माहित आहे का?
आम्ही
मायक्रोस्कोप च्या मदतीने डोळ्यांना न दिसणारं सूक्ष्मजीवांचं एक नवीन जग पाहिलं!
आपल्या स्वयंपाक घरात असणारा कांदा जो आपण भाजीत टाकण्यासाठी किंवा जेवताना खातो त्याच कांद्याचा वापर करून आम्ही पेशीचं गुणसूत्री आणि अर्ध गुणसूत्री विभाजन बघितलं...विज्ञानातील हे नव नवीन रहस्य जे आपल्याच भोवती आहे ते प्रत्यक्ष पाहण्यात व समजून घेण्यात एक वेगळीच मज्जा येते...
No comments:
Post a Comment