पालवी प्रकल्प हा HIV +ve अनाथ मुलांसाठी निवासी प्रकल्प आहे. व त्यालाच जोडून पालवी ज्ञानमंदिर हा प्रकल्प असल्यामुळे. आपण आपल्या घरच्या मुलांचा अभ्यास घेतो. त्याचप्रमाणे पालवीतील बालकांचा सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी एक - एक तास अभ्यास घेतला जातो. त्यामध्ये मराठी, इंग्रजी ,गणित या विषयाचे ज्ञान वाचन लेखन यांचा सातत्याने अभ्यास सुरू आहे. त्या उपक्रमाला आपण रात्र अभ्यासिका असे नाव दिले आहे. रात्र अभ्यास घेत असताना मुलांना जो विषय अवघड जात असतो, त्याचे सुद्धा शंका निरासन केले जाते. त्यामुळे मुलं कधीही कंटाळा करत नाहीत. कधीतरी त्यांच्या आवडीचा गेम सुद्धा घेतो. दहा ते पंधरा मिनिटे अशी ही आपली रात्र अभ्यासिका आहे.
Miss. Sunita Subhash Kharat
Program Officer
No comments:
Post a Comment