Note -

पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत. पालवी HIV बाधित विशेष बालकांचा संगोपन व पुनर्वसन प्रकल्प. www.palawischool.blogspot.com या (संकेतस्थळावर) पोर्टलवर प्रसारित होणारी शैक्षणिक माहिती लेख, अग्रलेख, कथा,कविता,व्हिडीओ,आणि छायाचित्रे पालवी ज्ञानमंदिर च्या पूर्व परवानगीशिवाय कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास कॉपीराईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो.याची सर्व विद्यार्थी पालक तथा शिक्षकांनी नोंद घ्यावी....

Gallery

Thursday, May 18, 2023

पालवीची शाळा - आरती पालवी

        पालवी ज्ञानमंदिर प्राथमिक ,माध्यमिक विद्यालयात दोन वर्षे झाले ,मी सहशिक्षिका म्हणून या विद्यालयात शिकवते .मुलांना समजेल अशा पद्धतीने शिकवले जाते .व मुलांच्या अडचणी काय आहेत .हे समजून घेतले जाते. त्यानुसार त्यांना शिकवले जाते .शाळेत वेगवेगळे उपक्रम चालू असतात .त्यातील वाचन ,कुतूहल कोपरा ,जनरल नॉलेज ,भिंती पत्रक ,रात्र अभ्यास,असे विविध उपक्रम चालू असल्यास मुलांच्यात प्रगती होत जाते. मुलांना आपल्याशी बोलताना त्यांना भीती वाटते .किंवा बोलू का नको असे होते .व मुले आपल्यापर्यंत येत नाहीत .अशामुळे त्यांना मुलांची एक दीदी किंवा ताई म्हणून या नात्याने शिकवले जाते .मुलांना शिकवत असताना मला त्यात आनंद वाटतो .मला शिकवायला आवडते .मुलांना शिकवत असताना त्यांच्यातल्या काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात .अशा पद्धतीत शाळा चालू असते. 

                                                                    -  Miss.Arati Ganmote

                                                                            Asst.Teacher

No comments:

Post a Comment