पालवी प्रकल्प हा 2001 मध्ये सुरू झाला. त्यामध्ये एच. आय .व्ही बालके असल्यामुळे बाहेरील शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे पालवीने 2007 मध्ये पालवीची शाळा सुरू केली. परंतु शाळेतील शिक्षकांना त्यांच्या मनायोग्य मानधन न मिळाल्यामुळे बरेचं शिक्षक शाळा सोडत होते .कोरोना मध्ये सर्व शाळा बंद पडले होते. बाहेरून जे शिक्षक येत होते .ते यायचे बंद झाले. आणि आता शाळेचा गंभीर प्रश्न पडला . मुलांना शिकवण्यासाठी कोणी नव्हते. तेव्हा माझी 10 वी झालेली होती. शाळेत शिकवायला शिक्षक नव्हते. मग विद्यार्थी दिवसभर अशीच बसून असायची. काही उन्हात फिरत राहायची काही मुलं पुस्तक वाचत असायची. तेव्हा आम्ही दहावी बारावी झालेल्या मुलींनी शाळा सुरू करण्याचं ठरवलं व शाळा चालू ठेवली. आज 2 ते 3 वर्ष झाली आम्ही पालवीमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करत आहोत.
- Miss.Shraddha D Kumbhar
No comments:
Post a Comment